Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >म्युच्युअल फंड > १० वर्षांत करोडपती व्हायचंय? म्युच्युअल फंड की ईटीएफ? तुमच्या पोर्टफोलिओसाठी कोणता पर्याय आहे बेस्ट

१० वर्षांत करोडपती व्हायचंय? म्युच्युअल फंड की ईटीएफ? तुमच्या पोर्टफोलिओसाठी कोणता पर्याय आहे बेस्ट

Mutual Funds vs ETF : म्युच्युअल फंड आणि ईटीएफ या दोन्ही पर्यायात अनेकदा गुंतवणूकदारांना कुठे गुंतवणूक करावी कळत नाही. तुमचाही गोंधळ होत असेल तर हा लेख तुमच्यासाठीच आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 17:21 IST2026-03-04T16:08:08+5:302026-03-04T17:21:24+5:30

Mutual Funds vs ETF : म्युच्युअल फंड आणि ईटीएफ या दोन्ही पर्यायात अनेकदा गुंतवणूकदारांना कुठे गुंतवणूक करावी कळत नाही. तुमचाही गोंधळ होत असेल तर हा लेख तुमच्यासाठीच आहे.

Mutual Funds vs ETF Which is Better for Long-Term Wealth Creation in India? | १० वर्षांत करोडपती व्हायचंय? म्युच्युअल फंड की ईटीएफ? तुमच्या पोर्टफोलिओसाठी कोणता पर्याय आहे बेस्ट

१० वर्षांत करोडपती व्हायचंय? म्युच्युअल फंड की ईटीएफ? तुमच्या पोर्टफोलिओसाठी कोणता पर्याय आहे बेस्ट

Mutual Funds vs ETF :शेअर बाजारातगुंतवणूक करून संपत्ती निर्माण करण्याचे स्वप्न प्रत्येकजण पाहतो. परंतु, योग्य पर्यायाची निवड करणे हे मोठे आव्हान असते. सध्या बाजारात म्युच्युअल फंड आणि एक्सचेंज ट्रेडेड फंड हे दोन पर्याय सर्वाधिक लोकप्रिय आहेत. दोन्ही माध्यमांतून तुमचा पैसा शेअर बाजारातच लागत असला, तरी त्यांच्या कार्यपद्धतीत आणि नफ्याच्या गणितात मोठा फरक आहे. १० ते २० वर्षांचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून गुंतवणूक करताना यातील बारकावे समजून घेणे गरजेचे आहे.

ट्रेडिंगची पद्धत आणि लवचिकता
म्युच्युअल फंड आणि ईटीएफमधील सर्वात मोठा फरक त्यांच्या खरेदी-विक्रीच्या पद्धतीत आहे.

  • ईटीएफची खरेदी-विक्री एखाद्या कंपनीच्या शेअरसारखीच शेअर बाजाराच्या कामकाजाच्या वेळेत कधीही करता येते. याची किंमत दिवसभर बाजाराच्या हालचालीनुसार बदलत असते.
  • म्युच्युअल फंड येथे तुम्ही दिवसाच्या शेवटी जाहीर होणाऱ्या NAV (नेट अ‍ॅसेट व्हॅल्यू) वरच युनिट्स खरेदी किंवा विकू शकता. ज्यांना दररोज बाजार पाहणे शक्य नाही त्यांच्यासाठी म्युच्युअल फंड चांगला आहे, तर सक्रिय गुंतवणूकदारांसाठी ईटीएफ अधिक लवचिक ठरतो.

खर्चाचे गणित आणि एसआयपीची सुविधा
खर्चाच्या बाबतीत ईटीएफ वरचढ ठरतो.

  1. खर्च : ईटीएफ हे 'पॅसिव्ह' गुंतवणूक प्रकारात मोडतात. ते फक्त निफ्टी किंवा सेन्सेक्ससारख्या निर्देशांकाची कॉपी करतात, त्यामुळे त्यांचा व्यवस्थापन खर्च खूप कमी असतो. याउलट, 'अ‍ॅक्टिव्ह' म्युच्युअल फंडात फंड मॅनेजरला संशोधनासाठी जास्त फी द्यावी लागते.
  2. गुंतवणुकीची सोय : म्युच्युअल फंडात SIP करणे अत्यंत सोपे आहे आणि त्यासाठी डिमॅट खात्याची गरज नसते. मात्र, ईटीएफसाठी डिमॅट आणि ट्रेडिंग खाते अनिवार्य असून प्रत्येक खरेदीवर ब्रोकरेज शुल्क द्यावे लागू शकते.

परतावा आणि जोखमीचे समीकरण

  • रिटर्न: म्युच्युअल फंडात फंड मॅनेजरचे उद्दिष्ट बाजारापेक्षा जास्त परतावा मिळवून देण्याचे असते. ईटीएफ मात्र केवळ निर्देशांकाच्या बरोबरीने परतावा देण्याचा प्रयत्न करतो.
  • जोखीम: ईटीएफमध्ये 'ट्रॅकिंग एरर'ची जोखीम असते, तर म्युच्युअल फंडात फंड मॅनेजरचा एखादा चुकीचा निर्णय महागात पडू शकतो.
  • कर : दोन्ही पर्यायांवर दीर्घकालीन आणि अल्पकालीन भांडवली नफा कराचे नियम सारखेच लागू होतात.

वाचा - ३६० कोटींच्या नफ्यातून वाटला २४० कोटी रुपयांचा बोनस; कर्मचाऱ्यांनी गोण्या भरभरुन नेली कॅश

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title : म्यूचुअल फंड बनाम ईटीएफ: आपके पोर्टफोलियो के लिए कौन सा बेहतर है?

Web Summary : म्यूचुअल फंड और ईटीएफ दोनों शेयर बाजार में निवेश करते हैं, लेकिन ट्रेडिंग, लागत और जोखिम में भिन्न होते हैं। ईटीएफ इंट्राडे ट्रेडिंग और कम खर्च प्रदान करते हैं, जबकि म्यूचुअल फंड एसआईपी विकल्प प्रदान करते हैं। चुनने से पहले निवेश लक्ष्यों और जोखिम सहनशीलता पर विचार करें।

Web Title : Mutual Funds vs ETFs: Which is best for your portfolio?

Web Summary : Mutual funds and ETFs both invest in the stock market, but differ in trading, costs, and risk. ETFs offer intraday trading and lower expenses, while mutual funds provide SIP options. Consider investment goals and risk tolerance before choosing.